पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना मंगळवारी सकाळी देण्यात येणाऱ्या फाशीला स्थगिती देण्यास दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी नकार दिला. या प्रकरणातील दोषींना मंगळवारी, ३ मार्च रोजी सकाळी सहा वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकविण्यात येणार आहे. विनय शर्मा, मुकेशकुमार सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर अशी दोषींची नावे आहेत.

'मातोश्री'बाहेर पिस्तुलासह दरोडेखोराला अटक

चारही दोषींविरोधात दिल्लीतील न्यायालयाने ७ जानेवारीला पहिल्यांदा डेथ वॉरंट जारी केले होते. त्यांना २२ जानेवारीला फाशी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. पण नंतर फाशीची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पण त्यावेळीही फाशीची अंमलबजावणी ३१ जानेवारीला आणखी पुढे ढकलण्यात आली. आता या चारही दोषींना ३ मार्चला फाशी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. चार दोषींपैकी एक असलेल्या पवन गुप्ता यांची निर्णय सुधार याचिका सोमवारीच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

मनसे नेते हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

चारही दोषींनी आपल्या बचावासाठी उपलब्ध असलेले सर्व पर्याय वापरून संपले आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर फासावर लटकविण्यात यावे, यासाठी केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एकाच प्रकरणातील चारही दोषींना एकाचवेळी फाशी देण्यात यावी, असे कायद्यामध्ये कुठेही म्हटलेले नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.