भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा हे पुढच्या आठवड्यात भाजपचे अध्यक्ष होणार असल्याची माहिती सोमवारी सुत्रांनी दिली आहे. २० जानेवारीला त्यांच्या नावाची घोषणा पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंह करतील असे सांगितले जात आहे.
'आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर उभं राहण्याची मोदींमध्ये हिंमत नाही'
नवीन अध्यक्षांच्या निवडणुकीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. नड्डा यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात २० जानेवारी रोजी औपचारिक घोषणा केली जाईल. सध्या नवीन राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतर विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांना मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळात गृहमंत्री बनविण्यात आले. तर जुलैमध्ये जेपी नड्डा यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले होते. तर, जेपी नड्डा मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते. ते संसदीय मंडळाचे सदस्य आहेत.
'मोदी आणि आदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडू'
गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत नड्डा यांची राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशच्या भाजपाच्या प्रभारी पदी नेमणूक करण्यात आली होती. समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाज पार्टी (बसपा) यांच्या महायुतीमुळे भाजपला उत्तर प्रदेशमध्ये तगडे आव्हान होते. लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या.
'पवारांना जाणता राजा, इंदिरा गांधींना दुर्गादेवी म्हणणं योग्य होतं का'