पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नोकरी गेल्याने तणावात असलेल्या इंजिनिअरने कुटुंबियांना संपवून केली आत्महत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

नोकरी गेल्यामुळे मानसिक तणावात असल्याने भोपाळमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आणि त्याच्या पत्नीने आपल्या मुलगा आणि मुलगी यांची हत्या करून नंतर स्वतः आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या इंजिनिअरने सोडियम नायट्रेट ऑनलाईन मागविले होते, अशीही माहिती पुढे आली आहे. कुटुंबियांची हत्या करण्यासाठी त्याने याचा वापर केला होता.

युतीही होणार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीहीः उद्धव ठाकरे

अभिषेक सक्सेना (४५), प्रीती सक्सेना (४२) आणि त्यांचे चौदा वर्षांचे जुळी मुले अव्दैत आणि अनन्या अशी मृतांची नावे आहेत. इंदौरमधील खुडेल भागात असलेल्या एका रिसॉर्टमध्ये या चौघांचे मृतदेह आढळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक यांचे ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये नुकसान झाले होते. पण आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यासाठी अभिषेक यांच्या बँक खात्यांची माहिती, मोबाईल क्रमांक यांचा शोध घेतला जात आहे. 

चार वर्षांपूर्वीच हे संपूर्ण कुटुंब दिल्लीतील द्वारकेतून इंदौरला राहायला आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याने आधी आपल्या अपत्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे. 

'खांदेरी' नौदलाच्या ताफ्यात दाखल; ही आहेत खास वैशिष्ट्ये

सक्सेना कुटुंबातील चौघांनी बुधवारी रात्री खुडेलमधील रिसॉर्टमध्ये प्रवेश केला होता. गुरुवारी संध्याकाळपर्यंत त्यांच्या रुममधून कोणीच बाहेर न आल्यामुळे रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी मास्टर कीच्या साह्याने त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी खोलीमध्ये चौघांचे मृतदेह आढळून आले. यानंतर पोलिसांनी माहिती देण्यात आल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला. खोलीमध्ये सोडियम नायट्रेटही आढळले आहेत.