पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फी दरवाढीविरोधात जेएनयूच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात

जेएनयूच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

दिल्लीतील जवाहर लाल नेहरु विद्यापीठ्यापीठाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. फी वाढ आणि हॉस्टेलच्या नियमांमध्ये बदल केल्याच्याविरोधात गेल्या १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. जेएनयू विद्यापीठामध्ये आज दीक्षांत समारंभ सुरु आहे. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित आहेत. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी समारंभात जाऊन उपराष्ट्रपतींना भेटण्याचा प्रयत्न केला. या शेकडो आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अशा वातावरणात दिल्लीत राहू शकत नाहीः अरविंद सावंत

गेल्या १५ दिवसांपासून हे विद्यार्थी जेएनयू कॅम्पसच्या आतमध्ये आंदोलन करत होते. मात्र आज या विद्यार्थ्यांनी दिल्लीतील रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरु केले आहे. विशेष म्हणजे फी वाढीविरोधात जेएनयूमधील सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या आहेत. सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जेएनयू कॅम्पसमध्ये हाताला काळी फित बांधून फी वाढीला विरोध केला. 

हैद्राबादमध्ये दोन रेल्वेची समोरासमोर धडक; ५ प्रवासी जखमी

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'फी दरवाढ, हॉस्टेलच्या नियमात बदल, विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयांना टाळे लावल्याविरोधात आंदोलन सुरु आहे. हॉस्टेलमध्ये फी वाढ आणि ड्रेस कोडसारखे निर्बंध लादले गेले आहेत. आम्ही १५ दिवसांपासून आंदोलन करत आहोत. मात्र कुलगुरु आमच्याशी बोलण्यास तयार नाहीत. जेएनयूमध्ये जवळपास ४० टक्के विद्यार्थी गरीब आहेत. हॉस्टेलची फी ६ ते ७ हजार रुपयांनी वाढवली आहे. ती या विद्यार्थ्यांना भरणे शक्य नाही, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. 

बांदीपोरा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश