पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेएनयू हिंसाचार: आयशी घोषसह २२ विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल

विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोष

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हिंसाचार प्रकरणी विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोषविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेएनयू प्रशासनाकडून तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी २२ विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आयशी घोषचे नाव आहे. हल्लातील जखमी विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्ली क्राईम ब्रॅचची टीम जेएनयू कॅम्पसमध्ये दाखल झाली आहे. 

'काश्मीरला भारत मुक्त करा असे म्हटले तर खपवून घेणार नाही'

दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार आणि शनिवारी जेएनयू कॅम्पसमध्ये गोंधळ घातला होता. या विद्यार्थ्यांनी सर्वर रुमला रोखून ठेवत काही जणांना ठांबून ठेवले होते. तसंच सर्व्हर रुमची तोडफोड केली होती. जेएनयू प्रशानसनाने या विद्यार्थ्यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जेएनयू हल्ला : व्हॉट्स अ‍ॅप मेसेज, फोटोंमुळे संशयाची सुई

दिल्लीतील वसंतकुंज पोलिस ठाण्यात सोमवारी जेएनयू हिंसाचार प्रकरणी आयशी घोष, विवेक कुमार, गौतम शर्मा, गीता कुमारी, साकेत मून, सतीश यादव, राजू कुमार, चुनमुन यादव, कामरान, मानस कुमार, दोलन आणि सारिका चौधरी यांच्यासह २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही.

JNU हिंसाचारः आझाद मैदानावरील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे