पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेएनयू हिंसाचार: कुलुगुरुंना हटवण्याची मागणी

कुलगुरु एम. जगदीश कुमार

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हिंसाचाराच्या घटनेनंतर आता कुलगुरु एम. जगदीश कुमार यांना हटवण्याची मागणी जोर धरु लागली आहे. जेएनयू विद्यार्थी संघटना आणि शिक्षकांनी कुलगुरुंवर हिंसक जमावाचा भाग असल्याचा आणि विद्यापीठात हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. 

विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा वारंवार प्रयत्न सुरु: सोनिया गांधी

जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोषने कुलगुरू एम. जगदीश कुमार हे अपात्र असल्याचा आरोप केला आहे. तसंच त्यांनी कुलगुरु पद सोडावे अशी मागणी केली आहे. माकपचे सरचिटणीस आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष सीताराम येचुरी यांनी सांगितले की, 'या हल्ल्यात कुलगुरूंचादेखील सहभाग होता. त्यांना त्वरित पदावरुन हटवायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

'ज्ञानेश्वर विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचा मला कमीपणा नाही'

जेएनयू शिक्षक संघटनेने कुलगुरुंनी राजीनामा द्यावा किंवा मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांना हटवावे, अशी मागणी केली. त्यांनी असा आरोप केला की, 'कुलगुरु भित्रे आहेत. त्यांनी मागच्या दारातून अवैध धोरणे लागू केली. कुलगुरु विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रश्नांपासून पळ काढतात आणि जेएनयूची प्रतिमा खराब करण्याची परिस्थिती निर्माण करत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. 

दिल्लीत या तारखेला होणार मतदान, 'व्हॅलेंटाइन डे'पूर्वीच