पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेएनयू हिंसाचार: हल्ला करणाऱ्या विद्यार्थिनीची ओळख पटली

जेएनयू हिंसाचार

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरु आहे. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या विद्यार्थिनीची ओळख पटली आहे. जेएनयू हिंसाचार प्रकरणी व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसणारी चेक्सचा शर्ट घातलेली, तोंड झाकलेली आणि हातात काठी घेतलेल्या तरुणीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी त्या विद्यार्थिनीला नोटीस बजावली आणि आणखी दोन तोंड झाकले्लया विद्यार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी  तपासात सहभागी होण्यास सांगितले.

शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजीनामे द्यावेतः संजय राऊत

हिंसाचारावेळी तोंड झाकलेली विद्यार्थिनी दिल्लीतील दौलत राम कॉलेजची आहे. जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या हिंसाचार आणि मारहाणीनंतर मिळालेल्या सीसीटीव्ही फूटेज आणि व्हायरल व्हिडिओमध्ये ही विद्यार्थिनी हातात काठी घेऊन दिसली होती. या विद्यार्थिनीचे तोंड कपड्याने झाकले होते. तिच्यासोबत इतर दोन विद्यार्थी सुध्दा तोंड झाकलेले आणि हातात काठी घेऊन उभे असल्याचे दिसले होते. या दोन विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. 

वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर; कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु

जेएनयूतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी आरोप केला आहे की, ही विद्यार्थिनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्य आहे. मात्र पोलिसांनी तिच्या राजकीय संबंधावर वक्तव्य करण्यास नकार दिला आहे. तसंच जेएनयू हिंसाचाराचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना आणखी सात जणांची ओळख पटवण्यात यश आले आहे. पोलिसांना आतापर्यंत ५५ जणांची ओळख पटण्यात यश आले आहे. या सर्वांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 

चंद्रावर जाण्यासाठी अब्जाधीशाला हवीये २० वर्षीय गर्लफ्रेंड!