पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा वारंवार प्रयत्न सुरु: सोनिया गांधी

सोनिया गांधी

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणाचा काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र निषेध केला आहे. भारतातील विद्यार्थी आणि तरुणांचा आवाज दाबण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. तसंच, रविवारी जेएनयूमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याकडे सरकारकडून जनतेच्या असहमतीच्या आवाजाला दाबण्यासाठी आठवले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

'जेएनयूतील हल्ल्याने २६/११ची आठवण करुन दिली'

या हिंसाचार प्रकरणी सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'मोदी सरकारच्या संरक्षणाखाली देशातील तरुणांचा आवाज दाबून गुंडांद्वारे हिंसाचाराला उत्तेजन दिले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. तसंच, हे अत्यंत निराशजनक आणि अस्वीकार्य आहे, असे सोनिया गांधींनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते, अनिल गोटेंची टीका

जेएनयू विद्यापीठात रविवारी तोंडाला रुमाल बांधून काही अज्ञात घुसले. त्यांनी वस्तिगृहात घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. जवळपास ५० हून अधिक अज्ञात कँम्पसमध्ये घुसल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोरांनी कँम्पसमधील गाड्यांची देखील तोडफोड केली. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये जेएनयूचे १८ विद्यार्थी जखमी झाले होते.  

तरुणीवर वार करुन हल्लेखोराने स्वतःला भोसकलं