पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेएनयू हिंसाचार प्रकरण: दिल्ली पोलिसांकडे ११ तक्रारी दाखल

जेएनयू प्रकरण

जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी एकूण ११ तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. यामधील एक तक्रार जेएनयूच्या प्राध्यापकाकडून दाखल करण्यात आली आहे. तर ३ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि ७ जेएनयूएसयू यांच्याकडून दाखल करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या सर्व तक्रारी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँच एसआयटीकडे पाठवल्या आहेत.

'काँग्रेस-NCPसोबत गेल्यामुळे हिंदुत्ववादी मतदार शिवसेनेपासून दूर गेला'

दरम्यान, जेएनयूतील विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोषने जेएनयू परिसरात झालेल्या हिंसाचार प्ररकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये तिने असे म्हटले आहे की, मी त्या घटनेची तक्रार दाखल करत आहे. ज्यामध्ये जमावाने मला मारहाण केली, धमकावले आणि मला जीवे मारण्याचा कट रचला आणि घडवून आणला. मी एफआयआर दाखल करुन दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करते.'

मराठा समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल अक्षय कुमारविरोधात तक्रार

आयशी घोषने तक्रारीमध्ये असे सांगितले आहे की,  ५ जानेवारीला तिला काही विद्यार्थ्यांकडून माहिती मिळाली होती की एबीव्हीपी संघटनेचे काही विद्यार्थी अज्ञात लोकांसोबत हातात काठ्या घेऊन गंगा बस स्टॉपजवळ एकत्र आले आहेत. आयशी घोषने पुढे तक्रारीत असे सुध्दा म्हटले आहे की, मला आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या निखिल मैथ्यू याला जमावाने घेराव घातला. 

'हिंदी सिनेमा बघत नाही, पण दीपिकाचा बघावा लागेल...'

पुढे तिने असे म्हटले आहे की, २० ते ३० लोकांनी मला एका कारजवळ खेचून नेले. मी आग्रह करुन देखील त्यांनी मला सोडले नाही. काठीने मला मारहाण केली. त्यामुळे मी खाली पडली. मला आवठते की एक व्यक्ती लाल रंगाचे स्वयटर घातलेला होता. ज्यावर यूसीएलए लिहिले होते. त्याच्या तोंडाला रुमाल बांधलेले नव्हते. त्या व्यक्तिला पुन्हा पाहिले तर मी ओळखू शकते.'

सुरक्षा महत्त्वाची, एअर इंडियानं इराणमधील विमान प्रवासाचे मार्ग