पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेएनयू हिंसाचार: ३ प्राध्यापकांची दिल्ली हायकोर्टात धाव

दिल्ली हायकोर्ट

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात रविवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी जेएनयूच्या प्राध्यापकांनी दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. जेएनयूच्या तीन प्राध्यापकांनी याप्रकरणी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये जेएनयू कॅम्पसमधील हिंसाचाराशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, डेटा आणि पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर; मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

५ जानेवारीला चेहरा झाकलेल्या हल्लेखोरांचे टोळकं जेएनयूच्या कॅम्पसमध्ये शिरले. त्यांनी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना जबर मारहाण केली. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले तर  महाविद्यालयाच्या मालमत्तेचंही मोठं नुकसान झाले होते. दरम्यान, याप्रकरणी दिल्ली पोलिसांना आणखी तीन तक्रारी मिळाल्या आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जेएनयू हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत १४ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 

'इंटरनेट सुविधा मूलभूत अधिकारी, काश्मिरातील निर्बंधांचा फेरविचार करा'
   
जेएनयू हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणारे गुन्हे शाखेचे पथक या सर्व १४ तक्रारींचा देखील तपास करत आहे. यापूर्वी या प्रकरणी दिल्ली  पोलिसांकडे ११ तक्रारी आल्या होत्या. त्यामध्ये एक तक्रार प्राध्यापकाद्वारे आणि इतर तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. या सर्व तक्रारी तपास करण्यासाठी गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आल्या आहेत. 

सत्तेचे टॉनिक संपल्यामुळे सूज उतरली, शिवसेनेची भाजपवर