पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

JNU कँम्पसमध्ये हाणामारी, विद्यार्थी अध्यक्षा आयशी घोष गंभीर जखमी

जेएनयू युनिवर्सिटीमध्ये हाणामारीचा प्रकार

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या वस्तिगृहात रविवारी दोन गटात हणामारी झाल्याची घटना समोर येत आहे. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील एक  व्हिडिओ व्हायरल होत असून हा सर्व प्रकार जेएनयू कँम्पसमध्ये झाल्याचा दावा करण्यात येत आहे.  

पाकमध्ये शीख युवकाची हत्या, भारताकडून संतप्त प्रतिक्रिया

एएनआयच्या वृत्तानुसार तोंडाला रुमाल बांधून आलेल्या काही अज्ञातांना वस्तिगृहात घुसून हाणामारी केल्याचा प्रकार घडला. जवळपास ५० हून अधिक अज्ञात कँम्पसमध्ये घुसल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोरांनी कँम्पसमधील गाड्यांची देखील तोडफोड देखील केल्याचे समजते. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोष हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अज्ञातांनी माझ्यावर हल्ला केला. मला बेदम मारहाण झाली, असे आयशी घोष या व्हिडिओच्या माध्यमातून सांगताना दिसते.

टाटा समूहामध्ये कोणतीही भूमिका बजावण्यात रस नाही : सायरस मिस्त्री

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना थक्क करुन सोडणारी आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ला हा गंभीर स्वरुपाचा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हिंसा रोखली असून विद्यापीठातील वातावरण नियंत्रणात आणले आहे. घटनास्थळी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ७ अँम्बुलन्स पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.  

'जेएनयू'मधील हाणामारीच्या प्रकारानंतर 'अभाविप'ने यामध्ये डाव्या आघाडीच्या विद्यार्थी संघटनेवर आरोप केला आहे. या हल्ल्यात जवळपास १५ विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मारहाण करण्यात आली आहे. डाव्या आघाडीच्या विद्यार्थी संघटनेने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. या सर्व प्रकरणानंतर राजकीय वातावरणगी तापण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील माहिती घेतल्याचे समजते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:JNU Students Union and ABVP members clash on university campus attacked on JNUSU President Aishe Ghosh