झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सत्तेत असलेल्या भाजपचा परभाव करण्यात झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी आघाडीला यश आले आहे. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी शरद पवार यांनी आम्हाला जिंकण्याची प्रेरणा दिली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Thank you so much @PawarSpeaks ji. Your battle in Maharashtra has been inspiring for all of us. https://t.co/FMLfsgh9GJ
— Hemant Soren (@HemantSorenJMM) December 24, 2019
NPR प्रक्रियेचा NRC शी काहीही संबंध नाही : अमित शहा
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या विजयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले होते. शरद पवारांच्या ट्विटला उत्तर देताना हेमंत सोरने यांनी त्यांचे आभार मानले आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रात केलेल्या संघर्षामुळे आम्हाला झारखंडमध्ये भाजपविरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सोरेन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
नो NRC- नो CAA कोणीही बंगाल सोडणार नाही; ममतांचा नवा नारा
दरम्यान, जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडी आघाडीला झारखंडमध्ये यश मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांची मंगळवारी झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधानसभेतील नेतेपदी बिनविरोध निवड झाली. सर्व आमदारांनी एकमताने हेमंत सोरेन यांची पक्षाच्या नेतेपदी निवड केली. झारखंडमध्ये जेएमएमने ३० जागांवर विजय मिळवत मोठे यश मिळवले. काँग्रेसला १५ जागांवर यश मिळाले आहे. तर आरजेडीला १ जागा मिळाली आहे. जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडी आघाडीला एकूण मिळून ४६ जागांवर यश मिळाले आहे.