पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'झारखंडमध्ये आजपासून नवा अध्याय सुरु होईल'

हेमंत सोरेन

झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे झारखंडमध्ये भाजप सत्तेबाहेर होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. निवडणूक निकालात स्पष्ट बहुमत पाहून जेएमएमचे नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या जनतेचे आभार मानले आहे. झारखंडमध्ये आजपासून एक नवा अध्याय सुरु होणार असल्याचे सांगितले.

झारखंड निकालानंतर शरद पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया

हेमंत सोरेन यांनी पत्रकार परिषद घेत असे सांगितले की,  'झारखंडच्या जवळपास ४० दिवसांच्या निवडणूक प्रवासाचा आज शेवटचा दिवस आहे. आज संपूर्ण राज्यात मतमोजणी सुरू आहेत. निकाल देखील स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आलेल्या मोजणीनुसार झारखंडच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा मी आदर करतो. सर्व मतादारांचे मी आभार व्यक्त करतो, असे त्यांनी सांगितले आहे.

 

 

'झारखंडच्या जनतेने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला'

पुढे त्यांनी असे सांगितले की, 'आजचा दिवस झारखंडच्या जनतेसाठी उत्साहाचा दिवस आहे. मात्र माझ्यासाठी राज्य आणि राज्यातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करू शकेल असा संकल्प करण्याचा दिवस आहे. लालू प्रसाद यादव, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे देखील त्यांनी सांगितले.  

धक्कादायक: तरुणाने स्वत:च्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडला