पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हेमंत सोरेन यांच्या शपथविधीपूर्वी नक्षलवाद्यांनी उडवले समाजभवन

हेमंत सोरेन

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना झाली आहे. तत्पूर्वीच नक्षलवाद्यांनी अडकी ठाण्याच्या क्षेत्रातील सेल्दा येथे शनिवारी रात्री उशिरा स्फोटकांद्वारे समाजभवन उडवले. 

सोशल युगात या गोष्टींमुळे लोकांमध्ये चिडचिड होते : PM मोदी

या घटनेनंतर एसडीपीओ आशिषकुमार महली यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाने घटनास्थळाचा आढावा घेतला आणि नक्षलवाद्यांचा तपास सुरु केला. घटनेनंतर सुरुवातीच्या तपासानुसार या स्फोटामागे माओवाद्यांचा हात आहे, असे महली यांनी सांगितले. 

या स्फोटात समाज भवनाचे मोठे नुकसान झाल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी रविवारी सकाळी समजली. तत्पूर्वी रात्री उशिरा ग्रामस्थांना स्फोटाचा आवाज आला होता. परंतु, दहशतीमुळे ते आपल्या घराबाहेर आले नव्हते. 

उत्तर भारतात धडकी भरवणारी थंडी! दिल्लीसह सहा राज्यांत 'रेड अलर्ट'

दहशतवाद्यांनी घटनास्थळी काही पोस्टर्सही लावले आहेत. यामध्ये सरकारी कार्यालयांमध्ये पोलिस कॅम्प न लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या नवनिर्मित कार्यालयात पोलिस कॅम्प उभारण्यात आले होते.