पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झारखंड जमाव हल्ला प्रकरण : दोन पोलीस अधिकारी निलंबित

तरबेज अन्सारी

झारखंड येथील सरायकेला खरसावा जिल्ह्यात जमावाने केलेल्या मारहाण प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर याप्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मागील आठवड्यातील मंगळवारी मोटर सायकल चोरीच्या संशयावरुन जमावाने केलेल्या मारहाणीनंतर अटक करण्यात आलेल्या तरबेज अन्सारी या २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. 

या प्रकरणात खरसावा पोलिस ठाण्याचे प्रभारी चंद्रमोहन उराव आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी विपीन सिंह यांना निलंबित करण्यात आले. याप्रकरणाकडे दुर्लक्ष करणे आणि प्रकरणाबाबत वरिष्ठांना माहिती न देण्याचा ठपका अधिकाराऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.  पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. याशिवाय राज्य सरकारने याप्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सुपूर्द केला आहे. या प्रकरणाचा तापस हा एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.  

'पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार आहे 

१७ जून रोजी रात्री दिडच्या सुमारास सरायकेला पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धतकीडीह येथे तिघेजण दुचाकी चोरीच्या उद्देशाने आले असल्याचा ग्रामस्थांना संशय आला. त्यातील दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले तर तरबेज अन्सारी गावकऱ्यांच्या तावडीत सापडला होता. गावकऱ्यांनी त्याला झाडाला बांधून मारहाण केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरबेजकडून 'जय श्री राम' नावाचा जप वदवून घेण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर येत आहे.  

'विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशांच्या ठेवणीला राष्ट्रीय दर्जा द्या'

या सर्व प्रकारानंतर गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी सकाळी सात वाजता घटनास्थळी दाखल होत तरबेज अंसारीला ताब्यात घेतले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला कारागृहात पाठवण्यात आले होते. २२ जून रोजी तरबेज अन्सारीची तब्येत बिघडली. कारागृह प्रशासनाने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:jharkhand mob lynching case 2 police officer suspended and 5 arrested in jharkhand mob killing