पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना जामीन, पासपोर्ट जमा करण्याचे आदेश

लालूप्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील देवघर कोषागारप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने ५०-५० हजारच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. न्यायालयाने त्यांना आपला पासपोर्टही जमा करण्याचा आदेश दिला आहे.

देवघर कोषागारप्रकरणातील शिक्षेचा कालावधी व्यतीत केल्याच्या आधारावर लालूंकडून जामिनाचा अर्ज दाखल करण्यात आला होता. 

सीबाआय न्यायालयाने लालूंना देवघर कोषागारप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी मागील दीड वर्षांपासून ते कारागृहात आहेत. सुमारे अर्धी शिक्षा त्यांनी भोगली आहे. याच आधारावर त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. 

याप्रकरणी सीबीआयकडून यापूर्वीच एक याचिका दाखल करण्यात आली आहे. साडेतीन वर्षांची शिक्षा वाढवण्याची मागणी सीबीआयने केली आहे. लालूंबरोबरील इतर आरोपींना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालूंवरही तेच आरोप आहेत. त्यामुळेच त्यांची शिक्षा तीन वर्षांनी वाढवून पाच वर्षे करावी, असे सीबीआयने न्यायालयाला म्हटले आहे. अजूनही ही याचिक उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Jharkhand High Court grants bail to RJD leader Lalu Prasad Yadav in the fodder scam case relating to Deoghar treasury