पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

JMM पेक्षा १५ टक्के जास्त मते घेऊनही भाजप पराभूत

JMM पेक्षा १५ टक्के जास्त मते घेऊनही भाजप पराभूत

झारखंडमध्ये भाजपला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले आहे. परंतु, यातही पक्षाला समाधानाची बाब म्हणजे मतांच्या टक्केवारीत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. प्रतिस्पर्धी झारखंड मुक्ती मोर्चापेक्षा (जेएमएम) भाजप खूप पुढे आहेत. इतकेच नव्हे तर भाजप आपले प्रतिस्पर्धी महाआघाडीचे तीनही पक्ष जेएमएम, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला (राजद) मिळालेल्या एकूण मतांच्या अगदी जवळ आहे. भाजपला झारखंडमध्ये ३३.४० टक्के मते मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी महाआघाडीला एकूण ३५.३५ टक्के मते मिळाली आहेत. यामध्ये जेएमएमला १८.७२ टक्के, काँग्रेसला १३.८८ टक्के आणि राजदला २.७५ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजेच भाजप आणि महाआघाडीमध्ये एकूण मिळालेल्या मतांमध्ये अवघे १.९ टक्क्यांचे अंतर आहे. 

झारखंडच्या जनेतेने आर्थिक दहशतवाद झुगारला, शिवसेनेची भाजपवर टीका

८१ विधानसभा मतदारसंघ असलेल्या या राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी ४१ आमदारांचा आवश्यकता आहे. तर जेएमएम (३०), काँग्रेस (१६), राजद (१) महाआघाडीच्या पारड्यात ४७ जागा आहेत. भाजपला राज्यात २५ जागा मिळाल्या आहेत. 

२०१४ मध्ये राज्यात सत्तेत भागीदार राहिलेल्या भाजपचा सहयोगी पक्ष आजसूला ८.१० टक्के मते मिळाली. आजसू आणि भाजपच्या मतांची बेरीज केली तर चित्र बदलले असते. भाजप आणि आजसू यांनी एकत्रित निवडणूक लढवली असती तर त्यांच्या युतीला ४१.५० टक्के मते मिळाली असती. 

पंतला सुधारण्यासाठी बीसीसीआय काही करायला तयार

निवडणुकीपूर्वी भाजप आणि आजसूदरम्यान जागावाटपावरुन संघर्ष झाला होता. अखेर सहमती न झाल्याने दोन्ही पक्षांनी वेगळा मार्ग पत्करला होता. त्याचबरोबर ०.७३ टक्के मते घेणारा जेडीयू आणि ०.३० टक्के मते मिळवणाऱ्या एलजेपीमुळेही भाजपच्या शक्यता कमजोर केल्या. विशेषतः जेव्हा २ टक्के मतांच्या अंतराने सत्तेचे समीकरण निश्चित केले. 

निवडणुकीच्या अगदी काही काळ आधी स्वकीयांनीच भाजपला मोठे धक्के दिले. एकीकडे सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते राहिलेले सरयू राय यांनी मुख्यमंत्री ऱघुवीर दास यांच्याविरोधात षड्डू ठोकले. इतकेच काय, त्यांनी त्यांचा पराभवही केला. त्याचबरोबर भगवा पक्षाचे मोठे नेते राधाकृष्ण किशोर यांनी भाजपची साथ सोडत एजेएसयूशी हातमिळवणी केली. किशोर यांचे एजेएसयूमध्ये जाणे भाजपसाठी मोठा धक्का होता.

अवघ्या दोन वर्षात भाजपचे साम्राज्य निम्मे झाले; पहा नकाशा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Jharkhand elections Results 2019 Jharkhand Vidhan sabha Partywise Vote Share BJP vote share 15 Percent higher than JMM Congress Hemant soren