पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Jharkhand: भाजपला का बसला झटका, ही आहेत १० कारणे

भाजप

झारखंड विधानसभा निवडणुकीचे कल स्पष्ट झाले असून भाजप यंदा २०१४ मधील आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करु शकलेली नाही. सत्ताधारी भाजपला पूर्वीइतक्या जागा मिळणार नाहीत. मागील वेळी आजसूबरोबर त्यांची युती झाली होती. परंतु, यावेळी ते एकट्याने निवडणुकीला सामोरे गेले. झारखंडच्या १९ वर्षांच्या राजकीय इतिहासात एकाही सत्ताधारी पक्षाला दुसऱ्यांदा आपली सत्ता टिकवता आलेली नाही. 

या निवडणुकीत भाजपच्या खराब कामगिरीमागे अनेक कारणे सांगितले जात आहेत. निवडणूक प्रचारात स्थानिक मुद्द्यांऐवजी राष्ट्रीय मुद्द्याला महत्त्व देणे, बिगर आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासींना नाराज करणे, सरयू राय यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची बंडखोरी.. भाजपच्या ढासळत्या कामगिरीचे १० कारणे पुढीलप्रमाणे..

Jharkhand Election Result 2019: १९ वर्षांच्या इतिहासात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही

१. महाआघाडीची एकजूट, भाजप एकाकी
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष एकजूट नव्हती. पण यंदा सर्व विरोधक एकत्र आले. निवडणुकीच्या खूप आधी जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडीने महाआघाडी स्थापन केली होती. योग्य ताळमेळ राखत खूप आधीच जागांचे योग्य पद्धतीने वाटप करण्यात आले. योग्य दिशा, अचूक रणनीतीसह प्रचार केला. तर भाजप अखेरच्या क्षणापर्यंत आजसूबरोबर युतीसाठी निर्णय घेऊ शकले नाहीत. अत्यंत शेवटच्या क्षणी त्यांची युती तुटली. जागा वाटप आणि निवडणूक प्रचाराला उशीर झाल्याचा परिणाम झाला. अनेक जागांवर आजसूच्या उमेदवारांनी भाजपचे नुकसान केले आहे. 

२. स्थानिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष
भाजपच्या मोठ्या नेत्यांनी संपूर्ण झारखंडमध्ये प्रचारादरम्यान राष्ट्रीय मुद्द्यावर भर दिला. मतदारांना हे आवडले नाही. यंदा मागीलवेळीपेक्षा १.३ टक्के कमी मतदान झाले होते. तिसऱ्या टप्प्यानंतर झालेल्या मतदानाच्या टप्प्यात एनआरसीसारखे मुद्द्याचे वर्चस्व राहिले. राम मंदिरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या मुद्द्यांचा बहुतांश प्रचारसभेत वापर करण्यात आला. दुसरीकडे महाआघाडीने निवडणूक प्रचारादरम्यान स्थानिक मुद्दे आणि आदिवासी हितांच्या मुद्द्यांना महत्त्व दिले. 

३. मुख्यमंत्रिपदाचा बिगर आदिवासी चेहरा उतरवणे महागात पडले
८१ जागांच्या झारखंड विधानसभा निवडणुकीत २८ जागा आदिवासींसाठी आरक्षित आहेत. महाआघाडीने आदिवासी समजाचे हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केले. दुसरीकडे भाजपचे रघुवर दास बिगर आदिवासी आहेत. त्यामुळे आदिवासी मते भाजपविरोधात एकत्र झाले. २०१४ मध्ये भाजपने आजसूबरोबर युती करत ३० टक्के आदिवासी मते आणि १३ एसटी मतदारसंघ मिळवले होते. २०१४ मध्ये भाजपने निवडणुकीपूर्वी रघुवर दास यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून उतरवले नव्हते. 

Jharkhand Election Result 2019: त्रिशंकू अवस्थेत हे नेते ठरतील 'किंगमेकर'

४. गेल्या २० वर्षांपासून आजसूबरोबरची युती तुटली
मागील निवडणुकीत भाजपची आजसूबरोबर युती झाली होती. भाजप ७२, आजसू ८ आणि एक जागा लोजपाला देण्यात आली होती. त्यावेळी भाजपला ३७, आजसूला ५ जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि आजसूचे युतीचे सरकार अस्तित्वात आले. भाजपने जेव्हीएमचे सहा आमदार फोडत त्यांना भाजपमध्ये घेतले. यावेळी भाजप आणि आजसू यांच्या जागावाटपावरुन मतभेद निर्माण झाले आणि युती होऊ शकली नाही. 

पाच वर्षांत झारखंडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आजसू ज्या जागांवर २०१४ मध्ये दुसऱ्या स्थानवार होती किंवा विजय मिळवल होता. त्याच जागांवर भाजपने दावा केला. चर्चांमध्ये यावर तोडगा निघू शकला नाही. दोघेही आपापल्या दाव्यांवर ठाम राहिले, त्याचे पर्यावसन युती तुटण्यात झाली. भाजपने जमिनीवरचे वास्तव काय आहे हे न जाणताच आजसूबरोबरची युती तोडली. सर्व काही दिल्लीच्या भरवशावर सोडले. एकट्याने निवडणून लढवली. या निवडणुकीत आजसूमुळे अनेक ठिकाणी भाजपला नुकसान झाल्याचे दिसून आले. 

५. २०१४ मधील आश्वासनांना लोकांनी उत्तर दिले
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने रोजगार, विकास आणि स्थिर सरकारचे आश्वासन देत सत्ता मिळवली होती. यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारात भाजपने झारखंडला आधीपेक्षा मागास बनवल्याचा मुद्दा प्रामुख्याने उचलला. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या एका अहवालात २०१५-१६ मध्ये भारत देशातील दुसरे सर्वांत गरीब राज्य राहिले. 

देशात गरिबीखालील लोकसंख्येचे प्रमाण २८ टक्के राहिले. तर हेच प्रमाण झारखंडमध्ये ४६ टक्के होते. औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात घसरण झाली. खाण क्षेत्रात घसरण झाली. मागील ५ वर्षांत राज्यातील गुंतवणूक कमी झाली. 

६. जमीन अधिग्रहण आणि काश्तकरी कायद्यात बदलाचा मुद्दा
जंगलाच्या परिसरातील जमीन अधिग्रहणाचे प्रकरण राज्यात दीर्घ काळापासून वादग्रस्त राहिला आहे. २०१६ मध्ये राज्य सरकारने राज्यात काश्तकरी कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न केला आणि २०१७ मध्ये जमीन अधिग्रहणाशी निगडीत नियमात ढिलाई आणली. या बदलांमुळे जमीन अधिग्रहण करणे सोपे झाले.

परंतु, या निर्णयामुळे दक्षिण झारखंडच्या संथाल परगना आणि चोटागापूर या आदिवासी बहुल भागात सरकार विरोधात रोष उत्पन्न झाला. काश्तकरी कायद्यातील बदलानंतर भलेही हा वाद थांबला. परंतु, रघुवर दास यांना या जमिनी बिगर आदिवासींना द्यायची होती ही गोष्ट आदिवासींच्या मनात घर करुन राहिली. 

साहित्य अकादामी विजेते डॉ. नंजुंदन यांचा मृत्यू, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

७. युतीचा निर्णय उशिरा
भाजपने निवडणुकीच्या रिंगणात आजसू किंवा इतर पक्षांशी युती करुन उतरणार आहे की नाही, हा निर्णय घेण्यास मोठा विलंब लावला. त्यामुळे उमेदवारांना तयारीला वेळ मिळाला नाही. दुसरीकडे महाआघाडीच्या प्रत्येक गोष्टीत एकवाक्यता दिसून आली. 

८. भाजपने महाराष्ट्रातील चूक झारखंडमध्ये केली
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण १४ पैकी १२ जागा भाजपने जिंकल्या. परंतु, गेल्या काही निवडणुकांमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदानाची पद्धत वेगळी-वेगळी राहिली आहे. यामुळे रघुवर दास यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती. हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकीवरुन तर भाजपने हे समजून घ्यायला हवे होते. केंद्रीय स्तरावरील मोदींच्या करिश्माई नेतृत्वाचा फायदा राज्यातील नेते उचलू शकले नाहीत.

९. एनआरसी आणि सीएएविरोधातील गोंधळाचा फटका
शेवटच्या तीन टप्प्यात सीएए आणि एनआरसीविरोधात झालेल्या आंदोलनामुळे मोठे नुकसान झाले. जेव्हा सीएए, एनआरसीच्या मुद्द्याने देशात जोर पकडला होता. त्यावेळी झारखंडमध्ये तीन टप्प्यातील निवडणुका बाकी होत्या. शेवटच्या टप्प्यात सर्वांधिक ७२ टक्के मतदान झाले. 

'झारखंड निकालांचा आणि नागरिकत्व कायद्याचा संबंध नाही'

१०. स्वकियांकडूनही नुकसान
या निवडणुकीत भाजपला स्वकियांकडूनही मोठे नुकसान झाले आहे. रघुवर दास यांचे सहकारी राहिलेले मंत्री सरयू राय यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात बंड पुकारले. सरयू राय यांनी भाजपविरोधा प्रचार केला. भाजपने सरयू राय, बडकुवार गागराई, महेश सिंह, दुष्यंत पटेल, अमित यादव यांच्यासह २० नेत्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:jharkhand election result 2019 why bjp trailing in jharkhand and jmm congress rjd mahagathbandhan getting majority read 10 important points