पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Jharkhand Election Result 2019: त्रिशंकू अवस्थेत हे नेते ठरतील 'किंगमेकर'

सुदेश महातो आणि बाबूलाल मरांडी

झारखंडमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तर आजसूचे अध्यक्ष सुदेश महतो, झारखंड विकास मोर्चाचे  (जेव्हीएम) अध्यक्ष बाबूलाल मरांडी हे 'किंगमेकर' बनू शकतात.

कोण आहेत सुदेश महतो
एकोणीस वर्षांपूर्वी २००० मध्ये झारखंड अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत एकही असे सरकार नाही ज्यात सुदेश महतो यांची भागीदारी नाही. सरकार कोणाचेही असो, पण सुदेश महतो यांच्या पक्षातील कोणता ना कोणता नेता मंत्रिमंडळात सामील झाला आहे. रघुवर दास यांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले सुदेश महतो यांच्या पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवली आहे. शेवटच्या क्षणी जागा वाटपावर सहमती न झाल्याने त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली.

नुसत्या आडनावाने कोणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीसांची टीका

माजी मुख्यमंत्री मरांडी
एकेकाळी भाजपचा आदिवासी समाजाचा सर्वांत मोठा नेता म्हणून ओळखले जाणारे बाबूलाल मरांडी यांच्यावर सर्वांच्या नजरा टिकून आहेत. ते झारखंडचे पहिले मुख्यमंत्री झाले. परंतु, मरांडी यांनी २००६ मध्ये भाजपपासून वेगळे होत झारखंड विकास मोर्चाची स्थापना केली. मरांडी यांची शहरी मतदारांसह आदिवासी मतदारांवरही प्रभाव आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत महाआघाडीच्या पराभवामुळे त्यांनी त्यातून बाहेर पडणे पसंत केले. 

सरकार स्थापन करण्यासाठी भाजप घेणार आजसूची मदत
सुरुवातीच्या कलांवर विश्वास ठेवला तर भाजपला स्वबळावर सत्ता मिळणे अशक्य आहे. अशावेळी भाजप सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेईल. त्यावेळी भाजपची नजर ही आजसूवर असेल. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतरही आजसूचे सुप्रिमो सुदेश महतो यांच्याविरोधात भाजपने उमेदवार दिला नव्हता. आजसूनेही रघुवर दास यांच्याविरोधा उमेदवार दिला नव्हता. 

'जामियातील पोलिस कारवाईत एका डोळ्याची दृष्टी गमावली'

भाजप जेव्हीएमलाही चुचकारण्याची शक्यता आहे. जेव्हीएमचे बाबूलाल मरांडी यांनीही सकाळी माध्यमांशी बोलताना भाजप आपल्याला अस्पृश्य नसल्याचे म्हटले होते.