पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Jharkhand Election Result 2019: १९ वर्षांच्या इतिहासात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही

झारखंडच्या १९ वर्षांच्या इतिहासात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही (संग्रहित छायाचित्र)

Jharkhand Election Result 2019: वर्ष २००० मध्ये बिहारमधून वेगळे होत झारखंडची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे हे राज्य स्थापन झाल्यापासून १९ वर्षांत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. खिचडी सरकारचा परिणाम राज्याच्या विकासावर दिसला. १९ वर्षांच्या छोट्या कालावधीतही झारखंडने ६ मुख्यमंत्री पाहिले आहेत. 

Jharkhand Election Result 2019: त्रिशंकू अवस्थेत हे नेते ठरतील 'किंगमेकर'

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे रघुवर दास हे झारखंडचे पहिले मुख्यमंत्री  ठरले. यापूर्वी राज्यात बाबूलाल मरांडी, अर्जुन मुंडा, शिबू सोरेन, मधु कोडा, हेमंत सोरेन मुख्यमंत्री राहिले आहेत. २०१९ पूर्वी आतापर्यंत चार वेळा (२०००, २००४, २००९, २०१४) विधानसभा निवडणुका झाल्या. या चारही निवडणुकीत कोणत्याच पक्षाला एकट्याच्या जोरावर बहुमत प्राप्त करण्यात यश आलेले नाही. ८१ विधानसभा मतदारसंघ असलेल्या या राज्यात खंडित जनादेशामुळे राजकीय अस्थिरता राहिली आणि सातत्याने सत्ताबदल झाला. बहुमतासाठी इथे ४१ जागांची आवश्यकता आहे. परंतु, एकाही पक्षाला एकट्याने एवढ्या जागा जिंकता आलेल्या नाहीत. 

वर्ष २०१४ -
भाजपने एकट्याने ३७ जागा मिळवल्या. बाबूलाल मरांडी यांच्या जेव्हीएम पक्षाने अत्यंत खराब कामगिरी केली. ८ जागा जिंकणाऱ्या जेव्हीएमचे ६ आमदार फुटले आणि ते भाजपत दाखल झाले. जेएमएमने चांगली कामगिरी करत ते दुसऱ्या जागेवर राहिले. त्यांना १८ जागा मिळाल्या. काँग्रेसल्या अवघ्या ६ जागाच मिळाल्या तर ६ जागा इतर पक्षांना मिळाल्या. 

'जामियातील पोलिस कारवाईत एका डोळ्याची दृष्टी गमावली'

वर्ष २००९-
काँग्रेस (१४), झाविमो (११) आघाडीने २५ जागांवर विजय मिळवला. भाजपला जनतेने मोठा झटका दिला. त्यांच्या आमदारांची संख्या १८ इतकीच मर्यादित राहिल. एनडीएला अवघ्या २० जागाच राखता आल्या. यामध्ये जेडीयूचे दोनच आमदार निवडून आले. या निवडणुकीत भाजप आणि जेएमएमचे पारडे समसमान राहिले. जेएमएमलाही १८ जागा मिळाल्या होत्या. राजद आणि आजसूच्या आमदारांची संख्या प्रत्येकी ५-५ इतकी राहिली.

वर्ष २००५- 
२००५ च्या निवडणुकीत भाजपच्या आमदारांची संख्या घटून ३० झाली. १७ आमदारांसह जेएमएम दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला. तर काँग्रेस ९ जागांवरच थांबली. या निवडणुकीत जेडीयू ६ जागा जिंकल्या. राजद ७ आणि इतरांना १२ जागा जिंकल्या. 

कुलाब्यात वेश्या व्यवसायाचा भंडाफोड, तीन तरुणींची सुटका

वर्ष २०००- पहिली निवडणूक
वर्ष २००० मध्ये भाजपने जेडीयू, समता पार्टी आणि अपक्षांच्या मदतीने सरकार बनवले होते. या निवडणुकीत भाजपला ३२, समता पार्टीला ५ आणि जेडीयूला ३ जागा मिळाल्या होत्या. तर जेएमएमला १२, काँग्रेसला ११, राजदला ९ तसेच सीपीआयला ३ आणि इतरांना ६ जागा मिळाल्या होत्या.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Jharkhand Election Result 2019 close fight in BJP JMM Congress mahagathbandhan AJSU JVM no single party get clear mandate till now