पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झारखंडमध्ये भाजपला धक्का; प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुआंचा राजीनामा

लक्ष्मण गिलुआ

झारखंड विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा आता भारतीय जनता पक्षावर हळूहळू परिणाम होऊ लागला आहे. निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांनी राजीनामा दिला आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लक्ष्मण गिलुआ यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. झारखंड विधानसभा निवडणुकीत जेएमएम-काँग्रेस- जदयू आघाडीचा विजय झाला तर भाजपचा पराभव झाला आहे.

 

'...या पुढे यु-टर्न हा उद्धव ठाकरे टर्न म्हणून ओळखला जाईल'

हेमंत दास यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, झारखंड विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरीमुळे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला. महत्वाचे म्हणजे, झारखंड निवडणुकीत लक्ष्मण गिलुआ यांना आपली जागा देखील वाचवता आली नाही. चक्रधरपूर विधानसभा मतदारसंघातून जेएमएमच्या सुखराम ओरांव यांनी लक्ष्मण गिलुआ यांचा पराभव केला.

आंदोलकांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचा VIDEO उ. प्रदेश

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी २३ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. चक्रधरपूर विधानसभा मतदार संघातून जेएमएमचे उमेदवार सुखराम ओरांव विजयी झाले आहेत. सुखराम ओरांव यांनी भाजपचे उमेदवार लक्ष्मण गिलुवा यांचा १२ हजार २३४ मतांनी पराभव केला. तर सुखराम ओरांव यांना ४३ हजार ८३२ मतं पडली आहेत. दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता गमवावी लागली आहे.

सेबीच्या अतिरिक्त निधीतील ती रक्कम ताब्यात घेण्यावर सरकार 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:jharkhand bjp president laxman giluwa resigns from post following defeat in jharkhand assembly polls results 2019