पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Jharkhand Election Phase 2 Voting: मतदान केंद्रात गोळीबार, एकाचा मृत्यू

झारखंडमध्ये मतदान

झारखंडमधील सघनी जिल्ह्यातील सिसई विधानसभा मतदार क्षेत्रातील मतदान केंद्रावर पोलिस गोळीबारात एका ग्रामस्थाचा मृत्यू इतर दोघे जण जखमी झाले आहेत. या गोळीबारानंतर मतदान थांबवण्यात आले. दरम्यान, झारखंडमध्ये आज (शनिवार) दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. 

हैदराबाद एनकाऊंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक ए के झा यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलिस पथक मतदान केंद्र क्रमांक ३६ वर पोहोचले आणि त्यांनी मतदान केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. प्रारंभी मिळालेल्या माहितीनुसार मतदान केंद्राच्या आत काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न सुरु होता. सुरक्षा जवानांनी त्यंना रोखण्यासाठी मतदान केंद्रात गोळी चालवली. यात अश्फाक नावाच युवक जखमी झाला. त्यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी दगडफेक केली. या दगडफेकीत ठाण्याचे पोलिस अधिकारीही जखमी झाले आहेत. सुरक्षा जवानाच्या गोळीबारत जिलानी अन्सारीचा मृत्यू झाला आहे. तर अश्फाक अन्सारी आणि ठुपा अन्सारी जखमी झाला आहे. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

जगात भारताची ओळख 'रेप कॅपिटल' अशी झालीय : राहुल गांधी