पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Jharkhand Exit Poll: भाजपला धक्का बसणार, JMM-काँग्रेसकडे सत्ता ?

हेमंत सोरेन (PTI)

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी सांयकाळी संपुष्टात आले. त्यानंतर एक्जिट पोलच्या अंदाजात राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आघाडीचे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. विविध संस्थांनी केलेल्या एक्जिट पोलनुसार भाजपला पुन्हा सत्ता मिळणे मुश्किल आहे. तर जेएमएम आणि काँग्रेस आघाडीला सत्ता मिळण्याची मोठी संधी दिसत आहे. एकाही एक्जिट पोलमध्ये भाजप बहुमताजवळ जाताना दिसत नाही. 

CAA: भाजप सरकारकडून लोकांचा आवाज दाबला जात आहे-सोनिया गांधी

IANS-Cvoter-ABP एक्जिट पोलनुसार, जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडीला ३१-३९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला २८-३८ जागा मिळू शकतात. राज्यातील ८१ सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता आहे. 

इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्जिट पोलनुसार, झारखंडमध्ये जेएमएम-काँग्रेसचे सरकार सत्तेवर येण्याचा अंदाज आहे. एक्सिस माय इंडियानुसार, भाजपला २२-३२, जेएमएम आघाडीला ३८-५०, जेव्हीएमला २-४, एजेएसयूला ३-५ आणि इतरांना ४-७ जागा मिळू शकतात.

वायएसआर काँग्रेसच्या खासदाराने घेतला शहीद पोलिसाच्या बुटाचा मुका

टाइम्स नाऊच्या एक्जिट पोलनुसार झारखंडमध्ये भाजपला २८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेस, जेएमएम आणि आरजेडी आघाडीला ४४ जागा मिळताना दिसत आहे. 

इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या सर्वेनुसार भाजपविरोधात जनादेशाची स्थिती दिसत आहे. राज्यात बहुमताचे आकड्यासाठी ४१ जागांची आवश्यकता असताना सध्याचा विरोधी पक्ष आरजेडी-काँग्रेस-जेएमएम आघाडीला ३८ ते ५० जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस-जेएमएम आघाडीला ३८ टक्के तर भाजपला ३४ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाहीः नितीश कुमार

८१ सदस्य असलेल्या झारखंड विधानसभेसाठी ५ टप्प्यात ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान निवडणूक झाली. निवडणुकीत ढासळलेल्या अर्थव्यवस्थेपासून कलम ३७० हटवल्याचा मुद्दा, अयोध्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालासारखे राष्ट्रीय मुद्देच चर्चेत राहिले. त्याचबरोबर शेवटच्या दोन टप्प्यात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधी देशभर सुरु असलेल्या आंदोलनाचाही प्रभाव पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशासाठी साहसी निर्णय घ्यावे लागतातः पंतप्रधान मोदी

प्रमुख लढत ही भाजप आणि जेएमएम यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये आहे. महाआघाडीमध्ये काँग्रेस, आरजेडीचा समावेश आहे. जेएमएमचे नेते हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वात ही निवडणूक लढली गेली. लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचा हिस्सा राहिलेल्या माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांचा झारखंड विकास मोर्चा यावेळी त्यांच्याबरोबर लढला नाही.

IPL लिलावावेळी दिसलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण आहे ?

२०१४ च्या मागील विधानसभा निवडणुकीत एकूण ८१ पैकी भाजपने ३७ जागांवर (३१.३ टक्के मत) विजय मिळवला होता. एजेएसयूने ३,७ टक्के मते घेत ५ जागा जिंकल्या होत्या. जेएमएमला २०.४० टक्के मते मिळाली होती. त्यांच्या पक्षाला १९ जागा मिळाल्या होत्या. बाबूलाल मरांडी यांच्या जेव्हीएमने १० टक्के मते घेत ८ जागांवर विजय मिळवला होता.