पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांका गांधी म्हणाल्या, BJP प्रचार करण्यात सुपर हिरो पण,...

प्रियांका गांधी

Jharkhand Assembly Elections 2019: झारखंडच्या प्रचारसभेत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपवर तोफ डागली आहे. भाजप सरकार प्रचार करण्यात सुपर हिरो आणि कामे करण्यात सुपर झिरो असल्याचा टोला त्यांनी लगावला. पाखुरमधील सभेत त्या बोलत होत्या. 

प्रियांका गांधी म्हणाल्या की, याठिकाणची जमीन, पाणी याचे तुम्हीच मालक आहात. जल-जंगल आणि जमीनीसाठी संघर्षामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तुमच्या सोबत होत्या. त्यांनी तुमचा हक्क आणि अधिकार कायम ठेवण्यावर भर दिला. पण भाजप सरकार श्रीमंत लोकांच्या फायद्यासाठी तुमची जमीन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत  आहे. 

 

निर्भया प्रकरण: ७ जानेवारीला दोषींच्या डेथ वॉरंटवर होणार सुनावणी

त्यामुळेच ही निवडणूक आपल्या हक्काची लढाई आहे. भाजपने सत्तेत आल्यानंतर आदिवासी संस्कृतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्यासाठी जे कायदे तयार करण्यात आले ते कायदे रद्द करण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही विरोधात मैदानात उतरला नसता तर त्यांनी आपली मनमानी केली असती. भाजप सरकार प्रचारामध्ये सुपर हिरो असली तरी काम करण्याच्या बाबतीत ते सुपर झिरो आहेत, असा टोला प्रियांका गांधी यांनी भाजपला लगावला.    

निर्भया प्रकरण: दोषी अक्षयची फाशी कायम, पुनर्विचार याचिका फेटाळली

भाजपने १२ लाख गरीब कुटुंबियांची रेशन कार्ड रद्द केली आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात ३५ किलो तांदूळ देण्यात येत होते. सध्याच्या घडीला भाजप राज्यात केवळ ५ किलो तांदूळ दिले जात आहे, असे सांगत त्यांनी सरकार गरिबांचे नव्हे तर श्रीमंतांचे असल्याचे सांगत जनतेला काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन केले.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Jharkhand Assembly Election 2019 Congress leader Priyanka Gandhi addresses election rally in Jharkhand target BJP govt