झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपच्या जागा गेल्यावेळेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. निकालाचे ट्रेंड्स कायम राहिल्यास भाजपची या राज्यातील सत्ताही जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी झारखंडमधील निकाल म्हणजे सुधारित नागरिकत्व कायद्याची लिटमस टेस्ट नसल्याचे म्हटले आहे. राज्यातील निवडणूक ही तेथील मुद्द्यांवर लढविली जाते, असे शिवराजसिंह चौहान म्हणाले. जयपूरमध्ये त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले.
धावती रेल्वे थांबविण्यासाठी विनाकारण चेन ओढण्याच्या पुण्यात ८५ घटना
झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी सुरू झाली. या ठिकाणी भाजपची सत्ता होती. पण मतमोजणीचे ट्रेंड्स पाहता राज्यातील भाजपची सत्ता जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी सर्वाधिक जागांवर पुढे आहे. हीच आघाडी राज्यात सत्तेवर येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवराजसिंह चौहान यांनी हे विधान केले.
ते म्हणाले, सुधारित नागरिकत्व कायदा आणि झारखंडमधील निवडणूक यांचा संबंध येत नाही. राज्यातील निवडणूक ही तेथील मुद्द्यांवर लढविली जाते. शेजारी देशांमध्ये ज्यांना अत्यंत वाईट वागणूक मिळत होती. ज्यांच्यावर अत्याचार होत होते. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान म्हणून अवतरले आहेत. नरेंद्र मोदी यांनी या तीन देशातील अल्पसंख्य लोकांना पुन्हा एकदा जीवन बहाल केले असल्याचे त्यांनी सांगितले.
आता राहुल आणि प्रियांका गांधींनी लोकांना केलं हे आवाहन
सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवरून सध्या देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या मुद्द्यावरून देशाच्या विविध भागात सरकारविरोधात मोर्चे आणि आंदोलन सुरू आहे. झारखंडमधील निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच देशात हा मुद्दा चर्चेत आला होता.
Shivraj Singh Chouhan, BJP in Jaipur on being asked if BJP trails in #JhakhandAssemblyPolls, will it be a litmus test for #CAA: No such question arises. State elections are fought on issues concerning the state. pic.twitter.com/7narC5Y8Jp
— ANI (@ANI) December 23, 2019