पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिहेरी तलाक विधेयकावरून जेडीयूचा राज्यसभेत सभात्याग, सत्ताधाऱ्यांचा फायदा

संसद

तिहेरी तलाक विरोधी विधेयकावरील चर्चेवेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील NDA घटक पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडच्या JDU सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. यामुळे एक प्रकारे हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारला मदत होणार आहे. जनता दल युनायटेडच्या सदस्यांनी सभात्याग केल्यामुळे राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी आवश्यक सदस्य संख्या कमी होणार आहे. त्याचा सत्ताधारी पक्षाला फायदाच होणार आहे.

गणेश नाईकांनी राष्ट्रवादीची वाट लावलीः जितेंद्र आव्हाड

सभागृहातून सभात्याग करण्यापूर्वी जनता दलाचे नेते वशिष्ठनाथ नरेन सिंग म्हणाले, आमचा पक्ष महात्मा गांधी, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्या विचारांवर चालणार आहे. आमचा या विधेयकाला विरोध आहे. त्यामुळेच आम्ही या विधेयकावर बहिष्कार टाकतो आहोत.

तत्पूर्वी मंगळवारी दुपारी १२ वाजता केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत मांडले. स्त्री आणि पुरुष समानतेसाठी हे विधेयक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलांच्या सन्मानाचा आणि समानतेचा हा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. 

भाजपमध्ये उद्या चार आमदारांचा प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

आतापर्यंत लोकसभेत मंजूर झालेल्या या विधेयकाला राज्यसभेत फेटाळण्यात आले आहे. गेल्या १६ व्या लोकसभेतही राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले नाही. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा हे विधेयक मांडले असून, लोकसभेत ते मंजूर झाले आहे.