पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रशांत किशोर आणि पवन वर्मांची जदयूमधून हकालपट्टी

प्रशांत किशोर आणि पवन वर्मा

जनता दल यूनायटेड पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात वारंवार वक्तव्य करणाऱ्या जदयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि महासचिव पवन वर्मा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी दोघांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कार्यात सहभाग असल्याचा आरोप करत दोघांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. 

 ... म्हणून राज्य सरकारसंदर्भात मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना

नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांच्यासंदर्भात काल असे सांगितले होते की, ज्यांना पक्षाची भूमिका पटत नसेल तर त्यांनी पक्षातून बाहेर पडावे. १५ जानेवारी रोजी सुध्दा नितीश कुमार यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. तर प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार चुकीचे वक्तव्य करत आहेत असे सांगितले होते. 

INDvNZ: नाद करायचा नाय, सुपरओव्हरमध्ये टीम इंडियाचा विजय

पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर पवन वर्मा यांनी माध्यमांना सांगितले की, पक्षाचे विचार वेगळे आहेत आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची विचारधारा वेगळी आहे. सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावर पवन वर्मा सतत नितीश कुमार यांच्या विरोधात वक्तव्य करत आले आहेत. नितीश कुमार यांनी स्पष्ट सांगितले होते की, ज्यांना पक्षात थांबायचे त्यांनी थांबावे नाही तर जावे. त्यांच्या या वक्तव्यानंतर ते काहीतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. 

डीएसकेच्या अलिशान गाड्यांचा लिलाव १५ फेब्रुवारीला होणार