पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमध्ये जदयू नेत्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या

बिहारमध्ये रास्तारोको

बिहार पोलिसांच्या कार्यपध्दतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण बिहारमध्ये जदयूचे नेते गणेश रविदास यांनी गुरुवारी रात्री पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नालंदा जिल्ह्यामध्ये घडली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गणेश रविदास यांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी नगरनौसा पोलीस स्टेशनला घेराव घातला. तसंच नॅशनल हायवे ३० वर रास्तारोको केला. यावेळी पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आली. यामध्ये दोन पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डीआयजी राजेश कुमार यांनी याप्रकरणाती तीन दोषी पोलिसांचे निलंबन केले आहे. तिन्ही पोलिसांना  अटक देखील करण्यात आली. 

मराठा आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलीच्या अपहरण प्रकरणामध्ये गणेश रविदास यांना नगरनौसा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. गणेश रविदास अपहरणाच्या प्रकरणात आरोपी नव्हते तरी देखील पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, पोलिसांनी चौकशी दरम्यान गणेश यांना कारागृहात पाठवण्याची धमकी दिली होती. याला घाबरुन गणेश लघूशंकेच्या बहाण्याने पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर गेले त्याठिकाणी त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली. 

कर्नाटकः सुप्रीम कोर्टाने विधानसभाध्यक्षांना दिला मंगळवारपर्यंत वेळ

दरम्यान, या घटनेप्रकरणी गावकऱ्यांनी असा आरोप केला आहे की, पोलिसांनी गणेश रविदास यांच्यावर थर्ड डिग्री वापरली आणि त्यांना टॉर्चर केले. यालाच कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी गणेश यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मृत गणेश यांच्या डोक्यावर जखमा होत्या. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा तपास करत आहे. जोपर्यंत गणेश यांना त्रास दिलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. 

पराभवानंतर प्रथमच रोहितनं दिली 'ही' प्रतिक्रिया

संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तसंच नॅशनल हायवे ३० वर रास्तारोको केला. त्यादरम्यान त्यांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली. या दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेत डीआयजी राकेश कुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी याप्रकरणी नगरनौसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक कमलेश कुमार, एएसआय बलिंद्र राय आणि हवालदार संजय पासवान यांना निलंबित केले.