पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेडीयू नेत्याने प्रशांत किशोर यांची तुलना केली 'कोरोना विषाणू'शी

प्रशांत किशोर

नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि एनपीआरवरुन मोदी सरकारविरोधात आवाज उठवणारे जदयूचे नेते प्रशांत किशोर आता त्यांच्याच पक्षात एकटे पडताना दिसत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्यानंतर आता जदयूचे नेते अजय आलोक यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली आहे. 'प्रशांत किशोर हे कोरोना विषाणूसारखे आहेत. ते विश्वास ठेवण्या लायक व्यक्ती नाही, अशी टीका अजय आलोक यांनी केली आहे.

पुन्हा अर्णवला भेटलो... कुणालचे नवे ट्विट, तीन विमान कंपन्यांची बंदी

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अजय आलोक यांनी असे म्हटले आहे की, 'प्रशांत किशोर विश्वास ठेवण्या लायक व्यक्ती नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचा विश्वास जिंकू शकत नाही. ते आम आदमी पार्टीसाठी काम करत आहेत. ते राहुल गांधींसोबत बोलतात आणि ममता दीदींसोबत बसतात. कोण त्यांच्यावर विश्वास ठेवेल? आम्हाला आनंद आहे की हा कोरोना विषाणू आम्हाला सोडून जात आहे. त्यांना जिकडे जायचे आहे तिकडे जावे, असे त्यांनी सांगितले आहे. 

सायना नेहवालचा भाजप प्रवेश

यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्याबद्दल सांगितले होते की, 'कोणी ट्विट करत असेल तर करु दे. जोपर्यंत कोणाची पक्षात राहण्याची इच्छा आहे तोपर्यंत त्याने रहावे. कोणाला पक्षातून जायचे असेल त्याने जावे. नितीश कुमार यांनी पुढे असे देखील सांगितले की, अमित शहांनी मला सांगितले होते त्यानंतर प्रशांत किशोर पक्षात आले होते. 

'अर्थव्यवस्थेचे पुढे काय करायचे याबद्दल मोदी सरकार अनभिज्ञ'