पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून जपानने कोरोनाग्रस्त जहाजावरील प्रवाशांना वाटले २००० आयफोन्स

जपानजवळील समुद्रात उभ्या असलेल्या जहाजावर २००० आयफोन्स वाटण्यात आले आहेत.

कोरोनामुळे जपानजवळील समुद्रात उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी आता तेथील सरकारने २००० आयफोन्स वाटले आहेत. या आयफोनमध्ये लाईन नावाचे ऍप आधीच डाऊनलोड करून देण्यात आले आहे. जेणेकरून या माध्यमातून जहाजावरील प्रवासी डॉक्टरांची मदत, सल्ला घेऊ शकतात. या माध्यमातून प्रवासी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकणार आहेत. कोणती औषधे घ्यावीत, याचा सल्लाही डॉक्टर देऊ शकणार आहेत. 

... तर दिल्लीत काँग्रेस पक्ष सत्तेत असता, मिलिंद देवरांचे प्रत्युत्तर

जपानमधील आरोग्य मंत्रालय, कामगार मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांनी संयुक्तपणे आयफोन वाटले आहेत. लाईन ऍपच्या माध्यमातून वैद्यकीय मदत कशी मिळवायची याची माहिती देणारे एक पत्रकही प्रवाशांना देण्यात आले आहे. मॅकोताराने या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे.

माझगाव परिसरातील जीएसटी भवनला भीषण आग

डायमंड प्रिन्सेस जहाजावरील अनेक प्रवाशांकडे आयफोन नाहीत. त्यामुळे त्यांना लाईन ऍप डाऊनलोड करता येत नाही. ज्यांच्याकडे आयफोन आहे ते जपानमधून घेतलेले नाहीत. त्यामुळे त्यांनाही या ऍपचा उपयोग करता येत नाही. त्यामुळे जपानने या जहाजावर २००० आयफोन्स वितरित करण्याचा निर्णय घेतला.