पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रावर जाण्यासाठी अब्जाधीशाला हवीये २० वर्षीय गर्लफ्रेंड!

युसाकू माईजावा

आपल्यासोबत चंद्रावर येण्यासाठी गर्लफ्रेंड हवी असल्याची जाहिरात सध्या ऑनलाईन वर्तुळात चर्चेचा विषय झाली आहे. जपानमधील अब्जाधीशाने दिलेली ही जाहिरात आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकांचे लक्ष वेधते आहे. जपानमधील अब्जाधीश युसाकू माईजावा यांनी ही जाहिरात दिली आहे. स्पेसएक्समधून ते चंद्र पर्यटनासाठी जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही ऑनलाईन जाहिरात प्रसारित केली आहे.

बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'ची कमाल, ६० कोटींची कमाई; 'छपाक' खूप मागे

युसाकू माईजावा यांचे काही दिवसांपूर्वीच जपानी अभिनेत्रीशी ब्रेक-अप झाले होते. आता त्यांना २० वर्षांच्या मुलीशी संबंध जोडायचे आहेत. त्यासाठीच त्यांनी ही जाहिरात दिली आहे. त्यामध्ये संबंधित मुलीला अर्ज करावा लागणार आहे. आयुष्य पूर्णपणाने एन्जॉय करणाऱ्या मुलीने अर्ज करावेत, असे त्यात म्हणण्यात आले आहे. 

युसाकू माईजावा यांनी म्हटले आहे की, आजपर्यंतच्या आयुष्यात मी मला हवा तसाच जगत आलो आहे. आता माझे वय ४४ आहे. मला गेल्या काही दिवसांपासून एकटेपणा जाणवू लागलाय. त्यामुळेच एका मुलीशी प्रेमसंबंध जोडण्याची माझी इच्छा आहे. 

..तर उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील, गडाखांचा इशारा

युसाकू माईजावा यांना दोन पत्नींपासून तीन मुले आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, चंद्रावर जाणारी पहिली महिला ठरण्याची तुम्हाला इच्छा आहे का? 
इच्छुक महिलांना १७ जानेवारी २०२० पूर्वी अर्ज करायचा आहे. आलेल्या अर्जांमधून मार्च महिन्यांच्या अखेरिस एका तरुणीची या पदासाठी निवड केली जाईल.