पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जपानच्या पंतप्रधानांचा नियोजित भारत दौरा पुढे ढकलला

नरेंद्र मोदी आणि शिंझो आबे

जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांचा नियोजित भारत दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की उभय पक्षांनी एकमताने हा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देश मिळून लवकरच दौऱ्याची नवी तारीख निश्चित करतील. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आसाममध्ये होत असलेल्या तीव्र निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान शिंझो आबे आपला नियोजित भारत दौरा रद्द करण्याची शक्यता असल्याचे जपानमधील माध्यमांनी म्हटले होते. त्याला आता दुजोराच मिळाला आहे. 

संस्कृतमधून बोलल्यास मधुमेह, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो - भाजप खासदार

शिंझो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आसाममध्येच भेट होणार होती. पण या राज्यात सध्या तीव्र निदर्शने होत आहेत. तिथे लष्कर तैनात असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ही भेट आसाममध्ये होण्याची शक्यता कमी आहे. पण नागरिकत्व कायद्यातील सुधारणांना विरोध करीत संतप्त निदर्शने होत असल्याने हा दौराच रद्द करण्याचा विचार सुरू होता. दोन्ही देशांतील सर्वोच्च नेते यावेळी सोळाव्यांदा भेटणार होते. 

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा: अनिल गोटे

संसदेने मंजूर केलेल्या या विधेयकावर आता राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे १९५५ च्या नागरिकत्व कायद्यातील बदल आता लागू झाले आहेत. या बदलांनुसार ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन शेजारी देशांमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन समाजातील स्थलांतरितांना त्यांनी अर्ज केल्यावर भारतीय नागरिकत्व दिले जाईल. काँग्रेससह इतर प्रमुख विरोधी पक्षांनी या कायद्यातील सुधारणेला विरोध केला आहे.