पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूः जपानमध्ये आणीबाणी जाहीर

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी कोरोना विषाणूवर लगाम लावण्यासाठी टोकियो, ओसाका आणि पाच इतर ठिकाणी मंगळवारी आणीबाणी जाहीर केली आहे. 'एएफपी' या वृत्तसंस्थेनुसार, ही घोषणा बुधवारपासून अंमलात येणार आहे. आणीबाणीच्या टप्प्यात राजधानी टोकियो आणि इतर प्रमुख प्रांत कनागावा, सैतामा, चिबा, ओसाका, ह्योगो आणि फुकुओकाचा समावेश आहे. 

'कोरोनाचा एक रुग्ण ३० दिवसांत ४०६ जणांना करु शकतो बाधित'

आणीबाणीच्या घोषणेपूर्वी आबे म्हणाले होते की, सध्या अशी परिस्थिती बनत आहे की, त्याचा लोकांच्या जीवन आणि अर्थव्यवस्थेवर वाईट प्रभाव पडत आहे. आज सायंकाळी माझी मुख्यालयात बैठक बोलावून आणीबाणी घोषित करण्याची योजना आहे. 

त्यांनी टोकियो आणि ओसाकासारख्या शहरी परिसरातील वाढत्या कोरोना विषाणूबाधितांचा हवाला देताना एक दिवसापूर्वीच ही योजना घोषणा केली होती. घोषणा मध्यरात्रीपासून अमंलात येईल आणि या सात प्रभावित क्षेत्रातील गव्हर्नरांना लोकांना घरात राहण्यास बाध्य करणे तसेच उद्योगधंदे बंद करण्याचे अधिकार असतील.

शिवभोजन योजना तालुकास्तरावर, तीन महिने ५ रुपयांत थाळी

जपानमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेली ४८४५ प्रकरणे समोर आली असून १०८ जणांचा यात मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जपानमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.