पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात चकमकीत दोन दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये तैनात असलेले जवान

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश मिळाले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याबद्दल माहिती दिली. पोलिस आणि राष्ट्रीय रायफल्सचे जवान यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. अनंतनाग जिल्ह्यातील बिदूरा गावात दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर या संपू्र्ण गावाभोवती पोलिस आणि जवानांनी वेढा टाकला होता.

दोन दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतरही या भागात अजून चकमक सुरू असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गावाला पोलिसांनी वेढा घातल्याचे कळल्यावर दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले असून, त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. 

मृत पावलेले दहशतवादी कोणत्या संघटनेसाठी काम करीत होते, याची माहिती काढली जात आहे. तसेच त्यांची ओळखही पटविली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.