पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लष्करातील जवान औरंगजेबची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यासह तिघांचा खात्मा

औरंगजेबची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

पुलवामा  जिल्ह्यात शनिवारी सकाळी लष्काराने शोधमोहिमे अंतर्गत केलेल्या कारवाईत लष्कराचा जवान औरंगजेबच्या हत्येत सहभागी असलेल्या दहशतवाद्यासह 'हिज्बुल मुजाहिद्दीन' दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलीस विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरातील पंजगाम येथे दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने परिसराला चारीबाजूने घेरुन शोधमोहिम हाती घेतली. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 

लष्कराने मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. अंवतीपोरा येथील पंजगामचा रहिवासी शौकत डार, सोपोर परिसरातील इरफान वार आणि पुलवामा परिसरातील मुजफ्फर शेख अशी खात्मा केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे सर्व 'हिज्बुल मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

जम्मू-काश्मीरः पुलवामा येथे चकमक, तीन दहशतवाद्याचा खात्मा

लष्करांच्या तळावरील हल्ले, सामान्य जनतेवरील अत्याचार याशिवाय अन्य दहशतवादी कृत्याप्रकरणातील अनेक गु्न्हे त्यांच्या नावे नोंद आहेत.  २०१८ मध्ये लष्करी जवान औरंगजेब आणि पोलीस कर्मचारी आकिब अहमद वागे यांची हत्या करण्यात आली होती. यात डार याचा सहभाग होता. याशिवाय त्याच्याविरुद्ध अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचेही गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षातील जूनमध्ये ईदसाठी सुट्टीला निघालेल्या लष्करी जवान औरंगजेब याची दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केली होती.

काश्मीरमध्ये अतिदक्षतेचा इशारा, हवाई तळांवर दहशतवादी हल्ल्यांची शक्यता
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: jammu kashmir terrorist involved in murder of army jawan aurangzeb killed in encounter with security forces in pulwama