जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर जम्मू काश्मीरच्या उप-राज्यपालपदी माजी आयएएस अधिकारी गिरीश चंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राधाकृष्ण माथुर यांची लडाखच्या उप-राज्यपालपदी निवड करण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टीला 'क्यार' चक्रीवादळाचा धोका
उल्लेखनिय आहे की, ३१ ऑक्टोबरपासून जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येतील. सध्याच्या घडीला गिरीश चंद्र मुर्मू अर्थ मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत आहेत. ते १९८५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी मोदींच्या प्रमुख सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली होती. राधा कृष्ण माथुर १९७७ बॅचचे आयएएस अधिकारी असून २०१८ मध्ये ते मुख्य सूचना आयुक्त (CIC) पदावरुन सेवानिवृत्त झाले होते.
सेनेचा प्रस्ताव आल्यास हायकमांडसोबत चर्चा करु- काँग्रेस
सत्यपाल मलिक बिहारचे राज्यपाल होते. त्यानंतर मलिक यांची २०१८ मध्ये काही महिन्यांसाठी ओडिसाच्या राज्यपालपदी अतिरिक्त प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सत्यपाल मलिक यांनी १९८९ पासून १९९१ पर्यंत अलीगड संविधान सभेचे प्रतिनिधीत्व केले असून १९८०-८६ आणि १९८६ ते १९९२ ते उत्तर प्रदेश कडून राज्यसभा सदस्य राहिले आहेत.