पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीर होणार केंद्रशासित प्रदेश; कसे बदलणार अधिकार जाणून घ्या

जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात यावे तसंच त्यामधील काही तरतुदी वगळण्यात याव्यात असी शिफारस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेमध्ये केली. दरम्यान, 370 कलम हटवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे लडाख वेगळे राज्य बनणार आहे. 370 कलम हटवण्यात येणार असल्यामुळे आता दोन नवे केंद्रशासित प्रदेश निर्माण होणार आहे. लडाख हे विधीमंडळाशिवायचा केंद्रशासित प्रदेश तर जम्मू-काश्मीर विधीमंडळासह केंद्रशासित प्रदेश होणार आहे

ऐतिहासिक!, कलम ३७० हटवण्याची शिफारस, काश्मीर केंद्रशासित प्रदेश

देशामध्ये 7 केंद्रशासित प्रदेश

सध्या भारतामध्ये 29 राज्यांपैकी 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. यामध्ये दिल्ली, अंदमान-निकोबार, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दमन-दीव, लक्षद्वीप आणि पदुचेरी हे केंद्रशासित प्रदेश आहेत. 

देशात गाजत असलेला मुद्दा कलम 370 आहे तरी काय?

काय आहेत केंद्रशासित प्रदेशाचे अधिकार

केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्र सरकारने तयार केलेल्या कायद्यानुसार काम केले जाते. जरी याठिकाणी मुख्यमंत्र्याला जनता निवडून देत असली तरी संविधानानुसार याठिकाणी काम करण्याचे सर्व अधिकारी हे थेट राष्ट्रपतींना असतात. अंदमान-निकोबार, दिल्ली आणि पदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे प्रमुख उपराज्यपाल असतो. या राज्यामध्ये राज्यपालाला मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त अधिकार असतात. चंदीगडमध्ये प्रशासक हा मुख्य आयुक्त असतो. तर पूर्ण राज्य दर्जा प्राप्त झालेल्या राज्यांमध्ये राज्य सरकारचा प्रमुख मुख्यमंत्री असतो. मुख्यमंत्रीच या राज्यामध्ये सरकारला चालवतो. येथील सर्व विकास कामांचे निर्णय मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळाच्या मदतीने घेत असतो. 

मेहबूबा मुफ्ती, अब्दुल्लांसह अनेक नेते नजरकैदेत; कलम १४४ 

कसे बदलणार जम्मू-काश्मीर ?

1) जम्मू-काश्मीर आता राज्य राहणार नाही. जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळे केले गेले.

2) जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा असणार. मात्र लडाखमध्ये विधानसभा नसणार.

3) आधी जम्मू-काश्मीरमध्ये वेगळे संविधान होते. वेगळा झेंडा होता. मात्र यापुढे न वेगळे संविधान न वेगळा झेंडा असणार आहे. 

4) आधी जम्मू-काश्मीरवर राज्यपाल राजवट लागू होत होती. मात्र 370 कलम हटवल्यानंतर इथे राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे.

5) जम्मू-काश्मीर पोलीस यापुढे राज्यपालांना अहवाल सादर करतील.

काश्मीर प्रश्न निकाली लागायला सुरूवात झालीये - अनुपम खेर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:jammu kashmir now constitutes union territory know how will change rights of jammu kashmir