पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

J&K च्या मुद्यावरुन भारताने पाकला पुन्हा एकदा फटकारले

जम्मू काश्मीरच्या अंतर्गत मुद्यावर पाकने पुन्हा एकदा नाक खूपसले आहे.

जम्मू काश्मीरच्या मुद्यावरुन भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला चपराक लगावली आहे. जम्मू काश्मीर हा आमचा अंतर्गत मुद्दा असून यात हस्तक्षेप करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही, असे भारतीय पराराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जम्मू काश्मीरमधील रहिवासी नियमाच्या मुद्यावर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा भारताने शनिवारी पत्रकार परिषद घेत समाचार घेतला. 

कोविड-१९ : एकट्या मुंबईत एका दिवसांत ५२ रुग्ण, चार जणांनी गमावला जीव

भारताच्या अंतर्गत मुद्यावरुन भाष्य करुन तुम्हाला काहीही साध्य करता येणार नाही. तुमच्या नाहक दाव्याची कोणतीही दखल भारत घेणार नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. जम्मू काश्मीरमधील जनगणनेचे स्वरुप हे बेकायदेशीर असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला होता. याशिवाय नव्याने लागू करण्यात आलेल्या रहिवासी नियमावलीवरही पाकिस्तानने हस्तक्षेप नोंदवत विनाकारण नाक खूपसण्याचा प्रकार केला होता.  भारत सरकार नव्या नियमाच्या माध्यमातून कश्मीरींवर अन्याय करण्याचा डाव आखत आहे. भारताला याठिकाणी काश्मीर बाहेरील लोकांना आणायचे आहे, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. यावर भारताने पाकिस्तानला अंतर्गत मुद्यासंदर्भात हस्तक्षेप करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, अशी चपराक लगावली.

कोरोनाविरोधातील लढा एकत्रित लढू, मोदी-ट्रम्प यांच्यात एकमत!

पाकिस्तानने यासंदर्भात संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर धाव घेत मानवाधिकाराचे उल्लंघन करणारे काश्मीरमधील नव्या नियमाला स्थगिती देण्याची मागणीही केली आहे. जम्मू काश्मीरमधील नव्या नियमानुसार, 15 वर्ष रहिवाशी असणारा किंवा सात वर्षांपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये शिक्षणाचा पुरावा सादर करणारा, तसेच राज्यातील दहावी-बारावी परीक्षा देणारी व्यक्तीही मूळ निवासी असल्याचे ग्राह्य धरण्यात येणार आहे. याच मुद्यावरुन यापूर्वीही पाकने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला निर्णय चुकीचा असल्याचा दावा केला होता. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली होती.