पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोपोरमध्ये बस स्थानकाजवळ दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, ९ जण जखमी

यूरोपीय खासदारांचा एक गट जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर येण्याच्या एक दिवस आधी हा हल्ला झाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे दहशतवादी हल्ल्यात नऊ लोक जखमी झाले आहेत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी बस स्थानकावर सुरक्षादलांवर ग्रेनेड टाकला होता. सुरक्षादलांनी परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांना शोधण्यासाठी छापे मारले जात आहेत. हल्ल्याबाबत अजून विस्तृत माहिती समजू शकलेली नाही.यूरोपीय खासदारांचा एक गट जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर येण्याच्या एक दिवस आधी हा हल्ला झाला आहे.

दहशतवाद्यांच्या या ग्रेनेड हल्ल्यात नऊ सामान्य नागरिक जखमी झाले आहेत. जखमींमधील तिघांची प्रकृती गंभीर आहे. सीआरपीएफच्या १७९ वी बटालियनने घटनास्थळी धाव घेतली आहे. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रेलरची ट्रकला धडक, ३ ठार

दरम्यान, काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून सुरक्षादलांनी दहशतवांद्यांची कोंडी केली आहे. त्यामुळे दहशतवादी आता सामान्य लोकांवर निशाणा साधत आहेत.

यापूर्वी, श्रीनगर येथील करन नगर परिसरात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका पथकावर ग्रेनेड फेकला होता. या हल्ल्यात सहा जवान जखमी झाले होते. चौकीवर तैनात असलेल्या जवानांवर हा हल्ला झाला होता.