पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७०: पाकिस्तानने युएनएससीकडे बैठकीची केली मागणी

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा करणारे कलम ३७० रद्द केल्यामुळे पाकिस्तानची चिडचिड अजूनही सुरुच आहे. भारत सरकारच्या या निर्णयाचा पाकिस्तानने विरोध केला आहे. त्यासाठी पाकिस्तान वेगवेगळ्या पध्दतीने विरोध दर्शवत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी मंगळवारी सांगितले की, 'भारताच्या या निर्णयावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानने औपचारिकरित्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीची मागणी केली आहे.'

१५ ऑगस्टपर्यंत अजित डोवाल यांचा काश्मीर खोऱ्यात 'मुक्काम'

एका मुलाखती दरम्यान कुरैशी यांनी सांगितले की, त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांना बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. युएनएससीमधील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी मलेहा लोधी यांच्यामार्फत बैठक आयोजित करण्यासाठी औपचारिक पत्र पाठवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या निर्णयाला पाकिस्तान प्रादेशिक शांततेसाठी धोका असल्याचे समजत आहे,  असे देखील त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनी अमित शहांचा काश्मीर दौरा ठरलाय, पण...

दरम्यान, कुरैशी यांनी देशवासियांना शांत राहू नका असे सांगितले. पाकिस्तानींना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी नविन संघर्ष सुरु करावा लागणार आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवण्याच्या भारताच्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवणे पाकिस्तानसाठी सोपे होणार नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदींनी दिला सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा