जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा बुधवारी मध्यरात्री समाप्त झाला. आता ३१ ऑक्टोबर म्हणजे आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन नविन केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे तब्बल ७२ वर्ष जुना इतिहास बदलला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याच्या ८६ दिवसानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश बनले आहेत.
Leh: Radha Krishna Mathur takes oath as the first Lieutenant Governor of Union Territory of Ladakh. pic.twitter.com/lYpybg1YD0
— ANI (@ANI) October 31, 2019
LIVE: सरदार पटेल यांची १४४ वी जयंती; दिल्लीत 'रन फॉर युनिटी'ला सुरुवात
गृहमंत्रालयाने बुधवारी यासंबंधी अधिसूचना जारी केली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशात दोन नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. दरम्यान, लडाखमध्ये आर के माथुर यांनी उपराज्यपाल पदाची शपथ घेतली. तर जम्मू-काश्मीरमध्ये गिरीश चंद्र मुर्मू हे देखील उपराज्यपाल पदाची शपथ घेतील. श्रीनगर आणि लेह अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा शपथविधी सोहळा पार पडला. जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी दोघांना शपथ दिली.
मोदींनी घेतली त्यांच्या मातोश्रींची भेट
तर, पहिल्यांदाच एका राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहे. देशामध्ये राज्यांची संख्या २९ वरुन २८ झाली आहे. तर केंद्रशासित प्रदेशांची संख्या वाढून ९ झाली आहे.