पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू काश्मीरमध्ये नक्की काय सुरु आहे? अब्दुल्ला यांचा संतप्त सवाल

ओमर अब्दुल्ला

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात येत असल्याच्या गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या अहवालानंतर केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा स्थगित केली आहे. तसेच सरकारने यात्रेकरु आणि पर्यटकांना काश्मीर खोऱ्यातून जाण्याचा सल्ला दिला आहे. काश्मीर खोऱ्यातील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नॅशनल काँन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ओमर अब्दुल्ला यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सरकारवर या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, राज्यात सध्यस्थितीला कोणत्या हालचाली सुरु आहेत, हे आम्हाला माहिती हवी आहे. जेव्हा आम्ही काही अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारले तेव्हा त्यांनी काही तरी घडणार असल्याची माहिती दिली. पण नक्की काय होणार आहे याची कोणालाच कल्पना नाही. ते पुढे म्हणाले, "सोमवारी संसदेमध्ये केंद्र सरकारला अमरनाथ यात्रेवर स्थगितबद्दल उत्तर द्यावे लागेल.  

जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कलम ३५ अ,  ३७० किंवा राज्याच्या विभाजनाबाबत कोणतीही कारवाई सुरु नसल्याची ग्वाही दिल्याचेही अब्दुल्लांनी स्पष्टपणे सांगितले. विभाजनावेळी जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा कायम ठेवण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून आश्वासन हवे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.    

'या' कारणामुळे केंद्र सरकारकडून अमरनाथ यात्रा स्थगित

भारतीय गुप्तचर संस्थांनी काश्मीर खोऱ्यात संभाव्य दहशतवादी हल्ला आणि सोपोर येथे सुरक्षा दलांच्या स्थळांवर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना, विशेषतः जैश-ए-मोहम्मदकडून आयईडी स्फोट घडवले जाण्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये अतिरिक्त सुरक्षादलांना पाठवल्यानंतर अमरनाथ यात्रा स्थगित केली असून दहशतवादी विरोधी कारवाईसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: jammu kashmir after meeting with governor sp malik omar abdullah says nobody knows what going on