पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनंतनागमध्ये लष्कर-ए-तोएबाच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईमध्ये लष्कराला मोठे यश आले आहे. अनंतनाग येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मध्यरात्री चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. जम्मू-काश्मीरच्या बिजबेहरातील संगम भागामध्ये ही चकमक झाली.

लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडितेचा मृत्यू

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील संगम येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांनी संयुक्त कारवाई केली. शुक्रवारी मध्यरात्री सुरु झालेली चकमक शनिवारी पहाटेपर्यंत सुरुच होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. 

हिंदुंच्या सहिष्णुतेला कमजोरी समजण्याची चूक करु नका : फडणवीस

या चकमकीत जवानांनी लष्कर-ए-तोएबाचा कमांडर फुकरान यांच्यासह आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. घटनास्थळावरुन जवानांनी मोठा शस्त्रसाठा आणि दारुगोळासाठा जप्त केला. दरम्यान, मंगळवारी सुध्दा झालेल्या चकमकीत जवानांना तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते. पुलवामाच्या त्राल भागामध्ये ही चकमक झाली होती. 

उद्धव ठाकरे म्हणाले, PM मोदींनी मला वचन दिले!