पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मिरात नौशेरामध्ये सर्च ऑपरेशनवेळी गोळीबारात दोन जवान शहीद

काश्मिरात गस्त घालणारे जवान

जम्मू-काश्मीरमधील नौशेरा भागात लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या शोध मोहिमेवेळी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले. या ठिकाणी शोध मोहिम अद्याप सुरू आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे. शहीद जवानांबद्दल सविस्तर माहिती मिळालेली नाही.

नौशेरामध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर लष्कराचे जवानांनी या ठिकाणी शोध मोहिम सुरू केली. त्यावेळी एका ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. त्याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाल्याचे एएनआयने म्हटले आहे.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:jammu and kashmir two indian army soldiers lost their lives during a cordon and search operation in nowshera sector