पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर गुरुवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय

दल लेक

अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना  जम्मू-काश्मीरमधून  माघारी पाठविण्याबाबत गृह विभागाने दोन महिन्यांपूर्वी जारी केलेला  आदेश राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मागे घेतला आहे.  मलिक यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पर्यटकांसाठी जम्मू- काश्मीर पुन्हा खुले झाले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १० ऑक्टोबरपासून होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थिती पूर्ववत करण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे असं मानलं जातंय.

आरे कॉलनीतील २१४१ वृक्ष तोडली, मुंबई मेट्रोने दिली माहिती

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं २ ऑगस्टरोजी पर्यटक आणि यात्रेकरुंना तातडीनं माघारी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर तीन दिवसांनी काश्मीरमधलं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे कलम रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला त्यानंतर जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. 

तालिबानने ११ दहशतवाद्यांच्या बदल्यात ३ भारतीय अभियंत्यांना सोडले

जम्मू-काश्मीरमध्ये ब्लॉक विकास बोर्डाच्या निवडणुका घेण्याची घोषणा गेल्याच आठवडय़ात करण्यात आली होती. त्यानंतर तेथे पर्यटकांना पुन्हा प्रवेश देण्याचा हा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे.