पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, ६ जवान जखमी

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

देशभरात दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. श्रीनगर येथील करन नगर पोलिस स्थानकावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) ६ जवान जखमी झाल्याचे समजते.

कोथरुडमध्ये इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन पडून दोघांचा मृत्यू

एएनआयच्या वृत्तानुसार, शनिवारी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी करन नगर पोलिस स्थानकावर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सीआरपीएफ  बटालियन १४४ मधील जवान जखमी झाले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.   

दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांकडूनही प्रत्त्युत्तर देण्यात आले. दोन्ही बाजून जवळपास १५ मिनिटे गोळीबारी सुरु होती. या घटनेनंतर जवानांनी परिसराला चारी बाजूंनी घेराव घातला असून शोधमोहिम सुरु केली आहे.