पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरः नमाजनंतर दगडफेक, युवकांच्या हातात मुसा-मसूदचे पोस्टर

जम्मू-काश्मीरः नमाजनंतर दगडफेक, युवकांच्या हातात मुसा-मसूदचे पोस्टर

एकीकडे संपूर्ण देशभरात ईद उत्साहात साजरी केली जात असताना काही उपद्रवी युवकांनी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलावर दगडफेक केली आहे. श्रीनगरमधील जामिया मशिदीच्या बाहेर ही दगडफेक करण्यात आली. या माथेफिरु युवकांच्या हातात नुकताच मारला गेलेला दहशतवादी झाकिर मुसा आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेल्या मसूद अझहरचे समर्थन करणारे पोस्टर्स होते. इतकेच नव्हे तर यातील अनेक युवकांच्या हातात 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' अशी घोषणा असलेले बॅनरही दिसत होते.

ईदच्या नमाजनंतर या जमावाने मोठा गोंधळ घातला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षादलावरही जमावाने दगडफेक केली. यात काही जवान जखमी झाले. ईद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांना पुन्हा आपल्या घरी जावे लागले. या दगडफेकी दरम्यान जमावाच्या हातात आयसिसचे पोस्टर्सही दिसले. 

जमावातील युवकांनी आपले तोड झाकले होते. त्यांच्या हातात मुसा आर्मी अशा आशयाचे बॅनर होते. याचदरम्यान प्रशोभक घोषणा देण्यात येत होत्या. जमावाकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराचा वापरही करण्यात आला. हवेतही गोळीबार करण्यात आला. 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Jammu and Kashmir Stones pelted at security forces near Jamia Masjid in Srinagar and posters supporting terrorist Zakir Musa Masood Azhar