पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरला नवीन वर्षाची भेट, ५ महिन्यांनंतर एसएमएस-इंटरनेट सुरु

जम्मू आणि काश्मीर

सुमारे पाच महिन्यांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये सर्व मोबाइल फोनवर एसएमएस सेवा बहाल करण्यात आली आहे. रुग्णालयांतही ब्रॉडब्रँड इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून एसएमएस सेवा सुरु झाली आहे. जम्मूमध्ये मोबाइल इंटरनेटशिवाय इतर सेवा सुरु करण्यात आली होती. परंतु, काश्मीरमध्ये लँडलाइन आणि पोस्टपेड सेवा टप्प्याटप्याने देण्यात आली. 

जम्मू-काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कन्सल म्हणाले की, सर्व सरकारी रुग्णालयात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा आणि सर्व मोबाइल फोनवर पूर्णपणे एसएमएस सेवा बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. काश्मीरमध्ये अजून मोबाइलवर इंटरनेट आणि प्रीपेड मोबाइल सेवा सुरु करण्यात आलेली नाही.

नव्या वर्षात रेल्वे प्रवासासाठी मोजावी लागणार अधिक रक्कम

इंटरनेट सेवा कधी सुरु करायची याचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे कन्सल यांनी सांगितले. हा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा आहे. स्थिती सुधारल्यानंतर लवकरच ही इंटरनेट सेवा सुरु केली जाईल. टप्प्याटप्याने सर्व सरकारी रुग्णालये आणि शाळांमध्ये इंटरनेट सेवा सुरु केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अशी असेल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची वर्दी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Jammu And Kashmir SMS services restored in Kashmir valley broadband internet services in govt hospitals back from today on Happy New Year 2020