पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरः शोपियामध्ये चकमक, २ दहशतवादी ठार

शोपिया येथे दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे (ANI)

जम्मू-काश्मीरमधील शोपियामध्ये शनिवारी सकाळी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्य़ांचा खात्मा झाला आहे. एका इमारतीत २ ते ३ दहशतवादी लपून बसले होते, असे सांगण्यात येते. सुरक्षादलांनी इमारतीला घेरले असून शोध मोहीम सुरु आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षादलाने ही कारवाई केल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. 

तपासणीदरम्यान सुरक्षादलांना या मृत दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा मिळाला आहे. याबाबत आणखी माहिती अद्याप आलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तपासणी करताना सुरक्षादलांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यात २ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. अजूनही चकमक सुरु आहे.

लष्कराच्या उपप्रमुखपदी मनोज नरवणे

दरम्यान, डोडा जंगलात पकडलेल्या दहशतवाद्यावर बक्षीस होते. लष्कराचे हे मोठे यश आहे. लष्कर ए तोयबाच्या या दहशतवाद्यावार ५ लाखांचे बक्षीस होते.