पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

J&K: ईदचा उत्सव आनंदात साजरा, मुख्य सचिवांनी गोळीबाराचे वृत्त फेटाळलं

काश्मीर खोऱ्यात शांततेत पार पडला ईदचा उत्सव

कलम ३७० हटवण्यात आल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील ईदचा उत्सव तणावपूर्ण वातावरणात साजरा होणार का? अशी चिंता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रदेशातील अनेक ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला होता. याच वातावरणात काश्मीर खोऱ्यात सोमवारी ईदचा उत्सव साजरा करण्यात आला.  

'भारत-चीन यांच्यातील मतभेदाचा प्रभाव द्विपक्षीय संबंधावर नको'

जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव (योजना आयोग) रोहित कंसल यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात बकरी ईद अगदी शांततापूर्ण वातावरणात  साजरा झाला. यावेळी त्यांनी सुरक्षा संस्थांकडून काश्मीर खोऱ्यात गोळीबार झाल्याच्या घटनांचे वृत्तही फेटाळून लावले. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव (योजना अयोग) रोहित कंसल म्हणाले की, काही  प्रसारमाध्यमांनी काश्मीर खोऱ्यात गोळीबार झाल्याचे वृत्त दिले आहे.सुरक्षा संस्थांकडून एकही गोळी झाडण्यात आलेली नाही. तसेच एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

लडाख सीमेवर पाकच्या हालचाली तीव्र, विमानं तैनात

ते पुढे म्हणाले, आपापल्या नातेवाईकांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक घराबाहेर पडले. पुढील आठवड्यात हज यात्रेवरुन परतणाऱ्या ११ हजार यात्रेकरुंच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: jammu and kashmir principal secretary rohit kansal says not a single bullet fired on eid